मराठी गझल - मनातले बोलला थेट तर काय करावे - शिल्पा देशपांडे’


मनातले बोलला थेट तर काय करावे

झाले मी जर चेकमेट तर काय करावे

ज्याच्या नावाने देहाचे अत्तर होते

त्याची झाली रोज भेट तर काय करावे

 

स्पर्शाचा गंधक भिनलेला अंगोपांगी

मोहाने घेतला पेट तर काय करावे

 

जगात सुंदर तुझ्यासारखे एकच स्थळ हे !

पुढे म्हणाला स्वारगेट... तर काय करावे

 

भिनला आहे प्रेमाचा आजार असा की

संपून गेल्या प्लेटलेट तर काय करावे

 

त्याचे गलबत उतरलेच ना समुद्रात अन्

माझे झाले एक बेट तर काय करावे

 

प्लॅटाॅनिक की देहधार्जिणे प्रेम असावे

यातच गेला होत लेट तर काय करावे

 

तो ज्याचे माझ्यावर नाही प्रेम जराही

तोच निघाला सोलमेट तर काय करावे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

टिप्पणी करने के लिए 3 विकल्प हैं.
1. गूगल खाते के साथ - इसके लिए आप को इस विकल्प को चुनने के बाद अपने लॉग इन आय डी पास वर्ड के साथ लॉग इन कर के टिप्पणी करने पर टिप्पणी के साथ आप का नाम और फोटो भी दिखाई पड़ेगा.
2. अनाम (एनोनिमस) - इस विकल्प का चयन करने पर आप की टिप्पणी बिना नाम और फोटो के साथ प्रकाशित हो जायेगी. आप चाहें तो टिप्पणी के अन्त में अपना नाम लिख सकते हैं.
3. नाम / URL - इस विकल्प के चयन करने पर आप से आप का नाम पूछा जायेगा. आप अपना नाम लिख दें (URL अनिवार्य नहीं है) उस के बाद टिप्पणी लिख कर पोस्ट (प्रकाशित) कर दें. आपका लिखा हुआ आपके नाम के साथ दिखाई पड़ेगा.

विविध भारतीय भाषाओं / बोलियों की विभिन्न विधाओं की सेवा के लिए हो रहे इस उपक्रम में आपका सहयोग वांछित है. सादर.