डाग कुणाला लागत नाही कुठल्याही बेमानीचा
आजकालचे जगणे म्हणजे धंदा
हातचलाखीचा
काही प्रेषित
शांतीसाठी चर्चा करायला गेले
येउ घातला आहे म्हणजे भीषण काळ लढाईचा
दुनियेला करताना पाहुन
पापीयांचा उदो उदो
देवालाही येतो आहे आता राग
भलाईचा
कोण असा हा पसार होई
सगळ्यांच्या चुकवुन नजरा?
हरेक डोळा फुटतो आहे हरेक
नाकाबंदीचा
या विश्वाचा जीव घुसमटो आणी
त्याला सत्य कळो !
धूर धुमसतो आहे इतका जिथे
तिथे नाराजीचा
तिने बनविले आहे वाहन एका
महाग हत्तीला
झेपत नाही खर्च अता त्या
मुंगीला अंबारीचा
रक्त वाहते आहे कायम
कधीपासुनी सगळ्यांचे
आणि तरीही निकाल लागत नाही
मारामारीचा
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें