खूपच हलके वाटत आहे आता आयुष्या
(काढलास
तू नक्की कुठला काटा आयुष्या?)
बघतो आहे नवीन घर आता
माझ्यासाठी
तुला किती लागणार आहे जागा आयुष्या ?
जितके ठरले होते तितके श्वास
दिलेत तुला
तुझा कधी झालेला नाही तोटा
आयुष्या
बेसावध राहील विचारांची
कक्षा माझ्या
नकोस देऊ इतका सोपा मिसरा
आयुष्या
हवा तापली आहे ही कोणाच्या
श्वासांनी
चढला आहे तुझा कशाने पारा
आयुष्या ?
तुलाच कळले नव्हते प्रश्न
तुझ्यावर आलेले
जगण्याचा पेपर तर होता सोपा
आयुष्या
क्षणाक्षणांचे सूत कातरत
बसलो आहे मी
आणि तुझा झालेला आहे चरखा
आयुष्या
जग कुठल्या इच्छेने काढत आहे
चित्र तुझे ?
कशास तू ठेवलास कागद कोरा
आयुष्या ?
तू आहेस म्हणूनच आहे शांत
चिता माझी
तू गेल्यावर उडेल सगळा भडका
आयुष्या
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें
टिप्पणी करने के लिए 3 विकल्प हैं.
1. गूगल खाते के साथ - इसके लिए आप को इस विकल्प को चुनने के बाद अपने लॉग इन आय डी पास वर्ड के साथ लॉग इन कर के टिप्पणी करने पर टिप्पणी के साथ आप का नाम और फोटो भी दिखाई पड़ेगा.
2. अनाम (एनोनिमस) - इस विकल्प का चयन करने पर आप की टिप्पणी बिना नाम और फोटो के साथ प्रकाशित हो जायेगी. आप चाहें तो टिप्पणी के अन्त में अपना नाम लिख सकते हैं.
3. नाम / URL - इस विकल्प के चयन करने पर आप से आप का नाम पूछा जायेगा. आप अपना नाम लिख दें (URL अनिवार्य नहीं है) उस के बाद टिप्पणी लिख कर पोस्ट (प्रकाशित) कर दें. आपका लिखा हुआ आपके नाम के साथ दिखाई पड़ेगा.
विविध भारतीय भाषाओं / बोलियों की विभिन्न विधाओं की सेवा के लिए हो रहे इस उपक्रम में आपका सहयोग वांछित है. सादर.