मराठी गझल - करत आहेस तू अभ्यास कसला - जयदीप जोशी

 


करत आहेस तू अभ्यास कसला 

कुठे आहे तुला व्यवहार कळला

 

दिसत होती नदीडोंगरदऱ्याही

क्षणार्धातच किती अंधार पडला

 

कवडसे स्पर्श करणारे हरवले

कुणाचा आरसा कोणी बदलला?

 

दिव्याची ज्योत होती उंच त्याच्या

दिव्याखाली कमी अंधार दिसला

 

घरी दुसरे कुणी नव्हते म्हणूनच

पुन्हा टीशर्ट ला मी हात पुसला

 

पुन्हा मी एक पारंबी पकडली

पुन्हा झटक्यात माझा हात सुटला

 

कळत नाहीकशाला मिम करावे?

कधी जो दुखवला नसतादुखवला

 

असे आहेस तू बोलत स्वतःशी

जणू आहेस तू इतिहास रचला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें