भाग्यात जे न लिहिले ते
लाभणार नाही
मानावयास पण हे कोणी तयार नाही
उध्वस्त वावरांचे पाहून हाल
सारे
हतबल कृषीवलाच्या दुःखास पार नाही
अहवाल आज आला, 'नुकसान
फार नाही'
उंचीस गाठल्यावर इतकेच भान
ठेवा
ऐसा चढाव नाही ज्याला उतार
नाही
कैदेतुनी कुडीच्या सुटका करून नेतो
मृत्यू समान जिगरी दिलदार यार नाही

हृदय से आभार आपका नवीन जी मेरी मराठी रचना को सम्मान देने के लिए. 🌹 🌹. देवदत्त संगेप नागपूर.
जवाब देंहटाएं