पृष्ठ

आमच्या दुष्यन्तची अभिलाष फिटली पाहिजे - नवीन

आमच्या दुष्यन्तची अभिलाष फिटली पाहिजे। 
मान्य कर बा शंकरा! गंगा उतरली पाहिजे॥ 

व्यक्तिगत आलोचकांनो एवढे ऐकून घ्या। 
व्यक्तिगत आलोचनांची ढब बदलली पाहिजे॥ 

पूल थरथरता असू दे अन् नदीला पूरही। 
फक्त हे लक्षात घ्या गाडी निसटली पाहिजे॥ 

ओफफो संकोच कसला, यात आहे फायदा। 
पाहिजे परिणाम तर चर्चा घडवली पाहिजे॥ 

लोकशाहीच्या मधेही लोकही मरणार तर। 
लोकशाहीच्या बळीची वेळ ठरली पाहिजे॥

नवीन सी चतुर्वेदी




[शायर की माँ-बोली मराठी नहीं है]

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें